Monday 28 May 2012

मोनॅको ग्रां.प्रि. 2012 सहा पॆकी सहा


शेवटी सहावा शर्यतीचा विजेता कोण या प्रश्नाच उत्तर मिळाल. या शर्यतीचा विजेता झाला मार्क वेब्बर. मार्कने ही शर्यत दुसर्यांदा जिंकली आणि तो मोसमातील सहा शर्यतील सहावा विजेता ठरला. Formula 1 इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. मागील शर्यतील अपघातामूळे शुमाकरला पाच स्थानांची पेन्लटी मिळाली होती. यामूळे पात्रता फेरीत दुसरा आलेल्या मार्कला पोल पोझिशन मिळाली. याचा पुरेपूर फायदा घेत त्याने मोनॅको ग्रां.प्रि. दुसर्यांदा जिंकली. मर्सिडीजच्या निको रोसबर्गने दुसरा तर फेरारीच्या फर्नन्डो अलोन्सोने तिसरा क्रमांक पटकावला.

या शर्यतीची सुरुवात भयानक झाली. नेहमी प्रमाणे लोटसच्या रोमेन ग्रॉसजानने धाडाकेबाज सुरूवात केली. पण शुमाकरने त्याच्या अपेक्षांना सुरूंग लावला. त्याचा पहिल्याच वळणावर अपघात झाला. त्याच्या अपघाताने स्पॅनिश विजेता मालडोनॅडो आणि पेड्रो दे ला रोसा यांचा देखील अपघात झाला. त्यात कोबायाशीच्या गाडीचे नुकसान झाले आणि त्याला शर्यत सोडावी लागली.

पात्रता फेरीत अलोन्सो पाचवा तर मास्सा सहावा आला होता. त्यांनी आक्रमक सुरूवात करून अनुक्रमे तिसरा व चॊथा क्रमांक पटकावला. पण पिट स्टॉपमधील उशीर मास्साला महागात पडला आणि त्याला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. डबल विश्वविजेता आणि गतवर्षिचा मोनॅको विजेता वेट्टेल चॊथा आला. शर्यतीचा संभाव्य विजेता असलेल्या हॅमिल्टनला पाचवा क्रमांक मिळाला. चॊथा आलेला वेट्टेल विजेत्या वेब्बर पासून अवघ्या 1.3 सेकंद अंतरावर होता.

फोर्स इंडियासाठी ही शर्यत पर्वणीच ठरली. त्यांचा पॉल दे रेस्टा सातवा तर निको हल्कबर आठवा आला. लोटसचा किमि नववा तर विल्लिअम्सचा सेन्ना दहावा आला. भारतीय नरेन कार्थिकेयनने शेवटचा-पंधारावा क्रमांक पटकावला. नऊ चालकांना शर्यत पुर्ण करता आली नाही. यात बटण, रिकार्डो, पिक, शुमाकर, पेट्रोव, कोबायाशी, पेड्रोव, मालडोनॅडो आणि ग्रोसजान यांचा समावेश होता.

Monday 21 May 2012

कोण असेल सहावा विजेता ????????


अत्ताच स्पॅनिश ग्रां.प्रि. संपली. अलोन्सो आणि किमीला कडव आवाहन देवून मलडोनॅडोने ही शर्यत जिंकली. त्याने विल्लिअम्सला 2004 नंतर प्रथमच विजय मिळवून दिला. त्याची ही फक्त 24वी शर्यत होती. त्याने 183 शर्यतींचा अनुभव असलेल्या अलोन्सोचे आणि 162 शर्यतींचा अनुभव असलेल्या किमिचे आवाहन मोडून काढले. त्याचे हे पहिलेच विजेतेपद.
त्याच्या या विजेतेपदामूळे या मोसमास वेगळेच वळण लाभले आहे. तो या मोसमातील पाचवा विजेता ठरला. त्याच्या या विजयाआधी बटन, अलोन्सो, रोसबर्ग आणि वेट्टेल विजेते झाले आहेत. आणि आश्चर्या म्हणजे प्रत्येकाचे संघ वेगळे आहेत. या आधी असा योग 1983मध्ये आला होता. आता सहावी शर्यत मोनॅकोला आहे. ही शर्यत प्रत्येकासाठी प्रतिष्ठेची असते. या शर्यतीत आपल्याला कदाचीत सहावा विजेता मिळू शकतो.

कोण असेल हा सहावा विजेता ?

हॅमिल्टन ? किमि ? वेब्बर ? रोमेन ? मास्सा ? की शुमाकर ?

लेविज हॅमिल्टन. मॅक्लारेनचा चालक. याने याआधी 2008मध्ये मोनॅको ग्रां.प्रि. जिंकली आहे. या मोसमात त्याला ऑस्ट्रिलिया, मलेशिया आणि स्पेन मध्ये पोल पोझिशन मिळाल्या आहेत. पण ऑस्ट्रिलियात आणि मलेशियात त्याला तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर स्पेनची पोल पोझिशन कमी फ्यूअलमध्ये वाहून गेली आणि त्याला शेवटून सुरूवात करावी लागली. पण DRS आणि KERS च्या बळावर तो आठवा आला. आता त्याला विजयाचे वेध लागले असतील.

किमि राईकेनन. लोटसचा चालक. याने याआधी 2005मध्ये मोनॅको ग्रां.प्रि. जिंकली आहे. या मोसमतील त्याची कामगिरी उत्क्रुष्ठच आहे. त्याने बाहरीनमध्ये दुसरा तर स्पेनमध्ये तिसरा क्रमांक पटकविला आहे. या कामगिरीच्या बळावर क्रमवारीत तो चॊथा आहे. त्याच्या नावावर एक जलद फेरीसुद्धा आहे. जर तो ही शर्यत जिंकला तर ही त्याचा 2009 बेल्जियन नंतर पहिला आणि त्याच्या संघाचा 2008 जपान नंतर पहिला विजय असेल.

मार्क वेब्बर. रेड बुलचा चालक. याने याआधी 2010मध्ये मोनॅको ग्रां.प्रि. जिंकली आहे. या मोसमातसुद्धा त्याने कडव आवाहन दिल आहे. पण नशिबाने साथ न दिल्यामूळे त्याला पहिल्या तिघात येता आल नाही.

रोमेन ग्रॉसजान. लोटसचा दुसरा चालक. रोबर्ट क्युबिकाच्या अनुपस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला. पहिल्या दोन पात्रता फेरीत चांगली कामगिरी करून देखील त्याला गुण मिळवता आले नाहीत. पण त्यानंतर त्याने मागे वाळून बघितलेच नाही. चीनमध्ये त्याने Formula 1 कारकिर्दीतला पहिला गुण मिलावला तो सहावा येवून. नंतर तर त्याने बाहरीनमध्ये तिसरा क्रमांक पटकावून सगळ्यांना तोंडात बोटे घालायला लावली. आता त्याला पहिले विजेतेपद खूणावत आहे.

फेलिप मास्सा. फेरारीचा चालक. आत्ताच्या मोसमातील त्याची कामगिरी अत्यंत खालच्या क्रमांकाची आहे. बाहरीनमध्ये नववा येवून त्याने 2 गुण मिळवले आहेत. यामूळे त्याचे फेरारी संघातील स्थान धोक्यात आले आहे. ब्राझिलीअन ग्रां.प्रि. – स्वतःच्या घरची शर्यत दोनदा जिंकणार्या या गुणी चालकाला आपले स्थान टिकवायला विजय हवाच आहे. कदाचीत ही शर्यत जिंकून आपले स्थान टिकवण्याचा प्रयन्न नक्किच करेल.

मायकल शुमाकर. Formula 1 चा सम्राट. मर्सिडीजचा चालक. त्याच्यासाठी या मोसमाची सुरूवात दुःस्वप्नासारखी आहे. ऑस्ट्रेलियात पात्रता फेरीत चॊथा येवूनही इंजीनमूळे त्याला शर्यत अर्धवट सोडावी लागली. चीनमध्ये तो पात्रता फेरीत तो दुसरा आला. पण शर्यतीत त्याच्या नशिबाचे चाक निखळले. तर स्पेनमध्ये ब्राझिलच्या सेन्नाला धडकले. बाकी मलेशिया आणि बाहरीन मध्ये चांगली कामगिरी करून एक-एक गुण मिलवला. शुमाकरने मोनॅको ग्रां.प्रि. 5 वेळा जिंकली आहे. नशिबाने साथ दिली तर सहाव्यांदा जिंकून मोसमातील सहावा विजयी चालक व्हायचा त्याचा मनसुबा असेल.

हे सहा चालक शर्यत जिंकायला उत्सुक असतीलच. पण त्यांच्या समोर आवाहन असेल ते बटन, अलोन्सो, रोसबर्ग, वेट्टेल व मालडोनॅडोचे आणि अन्य स्पर्धकांचे.
तर बघु कोण ठरतो सहाव्या शर्यतीचा विजेता.

तुम्हाला काय वाटतं ???