Monday 28 May 2012

मोनॅको ग्रां.प्रि. 2012 सहा पॆकी सहा


शेवटी सहावा शर्यतीचा विजेता कोण या प्रश्नाच उत्तर मिळाल. या शर्यतीचा विजेता झाला मार्क वेब्बर. मार्कने ही शर्यत दुसर्यांदा जिंकली आणि तो मोसमातील सहा शर्यतील सहावा विजेता ठरला. Formula 1 इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. मागील शर्यतील अपघातामूळे शुमाकरला पाच स्थानांची पेन्लटी मिळाली होती. यामूळे पात्रता फेरीत दुसरा आलेल्या मार्कला पोल पोझिशन मिळाली. याचा पुरेपूर फायदा घेत त्याने मोनॅको ग्रां.प्रि. दुसर्यांदा जिंकली. मर्सिडीजच्या निको रोसबर्गने दुसरा तर फेरारीच्या फर्नन्डो अलोन्सोने तिसरा क्रमांक पटकावला.

या शर्यतीची सुरुवात भयानक झाली. नेहमी प्रमाणे लोटसच्या रोमेन ग्रॉसजानने धाडाकेबाज सुरूवात केली. पण शुमाकरने त्याच्या अपेक्षांना सुरूंग लावला. त्याचा पहिल्याच वळणावर अपघात झाला. त्याच्या अपघाताने स्पॅनिश विजेता मालडोनॅडो आणि पेड्रो दे ला रोसा यांचा देखील अपघात झाला. त्यात कोबायाशीच्या गाडीचे नुकसान झाले आणि त्याला शर्यत सोडावी लागली.

पात्रता फेरीत अलोन्सो पाचवा तर मास्सा सहावा आला होता. त्यांनी आक्रमक सुरूवात करून अनुक्रमे तिसरा व चॊथा क्रमांक पटकावला. पण पिट स्टॉपमधील उशीर मास्साला महागात पडला आणि त्याला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. डबल विश्वविजेता आणि गतवर्षिचा मोनॅको विजेता वेट्टेल चॊथा आला. शर्यतीचा संभाव्य विजेता असलेल्या हॅमिल्टनला पाचवा क्रमांक मिळाला. चॊथा आलेला वेट्टेल विजेत्या वेब्बर पासून अवघ्या 1.3 सेकंद अंतरावर होता.

फोर्स इंडियासाठी ही शर्यत पर्वणीच ठरली. त्यांचा पॉल दे रेस्टा सातवा तर निको हल्कबर आठवा आला. लोटसचा किमि नववा तर विल्लिअम्सचा सेन्ना दहावा आला. भारतीय नरेन कार्थिकेयनने शेवटचा-पंधारावा क्रमांक पटकावला. नऊ चालकांना शर्यत पुर्ण करता आली नाही. यात बटण, रिकार्डो, पिक, शुमाकर, पेट्रोव, कोबायाशी, पेड्रोव, मालडोनॅडो आणि ग्रोसजान यांचा समावेश होता.

No comments:

Post a Comment