Sunday 18 March 2012

२०१२ ऑस्ट्रेलिया – तिसर्यांदा बटणकडे


अपेक्षेपेक्षा उत्कुठ्ष २०१२ मोसमाची सुरुवात झाली.

पहिल्याच वळणावर बटणने संघमित्र हॅमिलटनला मागे टाकून आघाडी घेतली ती शेवटपर्यंत टिकवून ठेवली. इतकेच नव्हे तर त्याने सर्वात वेगवान फेरीचीसुद्धा नोंद केली. पात्रता फेरीत अव्वल ठरलेल्या हॅमिल्टनला तिसर्या स्थानावर समाधान मानावे लागले.

गतविश्वविजेता वेट्टेल दुसरा आला आणि त्याने आपणही काही कमी नसल्याचे दाखवून दिले. घरच्या शर्यतीत खेळणारा मार्क वेब्बर एका क्रमांकाची प्रगती करत चॊथा आला. त्याची ही घरच्या मॆदानावर शेवटी स्पर्धा असण्याची शक्यता आहे.

पात्रता फेरीत अत्यंत खराब कराणार्या फेरारीला अलोन्सोच्या पाचव्या क्रमांकामुळे थोडा दिलासा मिळाला. पण त्यांचा दुसरा चालक मास्सा चांगल्या सुरुवातीनंतर ब्राझिलच्या सेन्ना ठोकून शर्यतीतून बाहेर पडला.

सोबरसाठी पात्रताफेरी खराब गेली. त्यांचे दोन्ही चालक Q३पर्यंत पोहचू शकले नव्हते. पण आजचा दिवस त्याचासाठी खूपच चांगला होता. जपानचा असलेला कोबायाशी सहावा तर दुसरा चालक पेरेझ आठवा आला. दोघांचे मिळून १२ गुण घेणार्या सोबरने तिसर्यास्थावर झेप घेतली.
दोन वर्षांनी पुनरागमन करणारा किमी सातवा आला. त्याला पात्रता फेरीत १८वे स्थान मिळाले होते. पण त्याचा संघमित्र असलेल्या ग्रोसजीनला पहिल्याफेरीतच अपघाताला सामोरे जावे लागले. बिचारा !

स्थानिक असलेला डॅनियल रिकार्डो ९वा आला. त्याने आपले गुणांचे खाते उघाडायला घरचेच मॆदान निवडले हे विशेष. त्याच्याकडे वेब्बरचा वारसदार म्हणून बघितले जाते.

सहारा फोर्स इंडियाला देखील या शर्यतीत १ गुण मिळवता आला. त्यांचा चालक पॉल डे रेस्टा याने शेवटाच्या काही सेकंदात DRS वापरून जीन-एरीकला मागे टाकून १०वा क्रमांक पटकावला. हल्कबर्ग पात्रता फेरीत ९वा आला. पण त्याला १ल्या फेरीरतच माघार घ्यावी लागली. तो सुद्धा ग्रोसजीन प्रमाणे कमनशिबी ठरला.

मर्सिडीजसाठी आजचा दिवस बहुदा अत्त्यंत वाइट होता. मायकलला ४८व्या फेरीत खराब इंजीनमुळे स्पर्धा सोडावी लागली. त्यावेळी तो तिसरा होता. शेवटच्या फेरीपर्यंत रोसबर्ग ७वा होता. पण शेवटून तिसर्या वळणावर त्याची गाडी घसरली आणि तब्बल पाच चालकांनी त्याला मागे टाकले.

मर्सिडीजसारखी परिस्थिती विल्लियम्सची झाली. त्यांचा चालक मॅलडोनॅडो शेवटच्या फेरीत अलोन्सोला मागे टाकण्याच्या प्रयत्नांत चाक तोडून बसला. तर सेन्नाने मास्साला आदळून बाद झाला.

No comments:

Post a Comment